

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेवर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन येथील शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक महेश निकम यांना देण्यात आले .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले असून ,संतप्त शिवसैनिकांनी राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ, महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारतीताई जाधव, तालुका प्रमुख सुनिल पवार, तालुका संघटक बापु जाधव, ऊपतालूका प्रमुख विजय जगताप, शहर प्रमुख मनोज आहेर, वसंत सुर्यवंशी,अशोक आहेर, भास्कर पवार, भाऊसाहेब चव्हाण, उपेंद्र आहेर, नंदु जाधव, देवा चव्हाण, विश्वनाथ गुंजाळ, नाजिम तांबोळी, समाधान शिंदे, विलास शिंदे, विजय आहेर, भाऊसाहेब आहेर. सतिश आहेर, जितेंद्र भामरे, सोमा शिंदे, महिला आघाडी च्या. ज्योतीताई थोरात, पद्मिनी वाघ, रत्ना बागुल, रेखा नेटारे,पुजा वाकुळे,माया सुतार, मोहिम तांबोळी, संतोष आहेर, राजु भामरे, किशोर भामरे, किशोर खैरनार आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम