देविदास बैरागी
तालुका प्रतिनिधी निफाड : निफाड ता15 निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निफाड शहर विकास आघाडी, शिवसेना कॉग्रेस ,बसपा ,अपक्ष आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या रुपाली विक्रम रंधवे यांची तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे अनिल कुंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
निफाड नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार शरद घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेस सकाळी 9 वाजता प्रारंभ करण्यात आला या निवड प्रक्रिये प्रसंगी निफाड शहर विकास आघाडी ,शिवसेना, काँग्रेस ,बसपा, अपक्ष आघाडीचे नगरसेवक रुपाली रंधवे, अनिल कुंदे, साहेबराव बर्डे, संदीप जेऊघाले, कविता धारराव, अरुंधती पवार, किशोर ढेपले , पल्लवी जंगम, , कांताबाई कर्डीले, अलका निकम, सुलोचना होळकर, विमल जाधव, शारदा कापसे, रत्नमाला कापसे, असे एकूण 17 पैकी एकूण 14 नगरसेवक उपस्थित होते तर विरोधी राष्ट्रवादी कॉग्रेसचे 3 नगरसेवक गैरहजर होते
प्रारंभी नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या रूपाली रंधवे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र आलेले होते नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून अनिल कुंदे तर अनुमोदक म्हणून किशोर ढेपले यांचे नाव होते रुपाली रंधवे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याने पिठासीन अधिकारी शरद घोरपडे यांनी रुपाली रंधवे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले
उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अनिल कुंदे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते अनिल कुंदे यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून किशोर ढेपले यांचे तर अनुमोदक रत्नमाला कापसे म्हणून याचे नाव होते उपनगराध्यक्षपदासाठी अनिल कुंदे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने पिठासीन अधिकारी शरद घोरपडे यांनी अनिल कुंदे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित केले
नगराध्यक्षपदी रुपाली रंधवे तर उपनगराध्यक्षपदी अनिल कुंदे यांची निवड झाल्याचे जाहीर करताच निफाड शहर विकास आघाडी ,शिवसेना ,काँग्रेस ,बसपा अपक्ष यांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात एकच जल्लोष करीत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार नवनिर्वाचित यांच्यावतीने अर्पण करण्यात आला
दरम्यान निफाड येथील शिवाजी चौकात नवनिर्वाचित नगराध्यक्ष रूपालीताई विक्रम रंधवेआणि उपनगराध्यक्ष अनिल पाटिल कुंदे यांचा सत्कार सोहळा अयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपिठावर माजी आमदार अनिल कदम नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधवे,निफाड शहर विकास आघाडी चे अध्यक्ष राजाभाऊ शेलार,युवासेनेचे विक्रम रंधवे प्रथमेश गीते निफाड पंचायत समितीचे अध्यक्ष स्वप्ना बागुल जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट शिवा सुराशे राजेश पाटील संदीप टरले गोकुळ गीते प्रकाश दायमा,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर शेलार राजेंद्र आहेर विजय देसाई राजेंद्र खैरनार यांच्यासह निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उप नगराध्यक्ष नगरसेवक यांचा सत्कार निफाडकर यांच्या वतीने करण्यात आला
उपस्थित शंकर बोराडे शिवाजी ढेपले नंदलाल चोरडीया राजाभाऊ राठी शशांक सोनी मुकुंद होळकर,शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय कुंदे राजेंद्र मोगल राजेश पाटील संदीप टर्ले पंडीत आहेर खंडु बोडके गोकुळ गिते , शिवा सुरासे , प्रकाश गोसावी नवनाथ भवर मधुकर शेलार राजाभाऊ सोमवंशी सुधिर कराड चंद्रकांत राजगिरे लहानु राऊत विजय देसाई राजुशेठ आहेर बाळासाहेब भाग्यवंत बाळासाहेब रंधवे सुनिल राऊत काशिनाथ राऊत गणेश राऊत एडवोकेट आहेर सुमित जाधव यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळी कर यांनी केले तर याप्रसंगी गणपत जाधव गीतांच्या मैफिलीला निफाडकर यांनी दाद दिली
निफाडकर नागरिकांनी आमच्यावर ती दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे राज्यात असलेले शिवसेनेची सत्ता आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून स्वप्नवत निफाड ची निर्मिती करणार असून ही नगरपंचायत गाव एक नंबर आणणार
– मा.आमदार अनिल कदम
निफाडच्या सर्व योजना पुर्ण करत विकासाचा रथ पुढे नेत नगरसेवकांच्या मदतीने शहराचा काया पालट करणार विरोधाला विरोधन करता गावाच्या विकासासाठी सर्वांनी हातात हात घालुन काम करु आणि राज्यात असलेल्या सतेचा उपयोग करत विकासाच व्हिजन राबविणार
– अनिल पाटील कुंदे, उपनगराध्यक्ष निफाड.
निफाडकरांनी गावाच्या विकासा साठी गावानी संधी दिली सर्वकुल परीस्थीती असतांनाही जमिनीवर राहुन गाव डोळ्या समोर ठेऊन काम करणार तसेच आमचे जातो गोत्र शिवसेना असल्याने कामातुन नावलौकीक वाढवणार
– रूपालीताई विक्रम रंधवे, नगराध्यक्ष निफाड
आजवर केलेल्या निफाडच्या विविध सामाजिक कामाची पावती आणि शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल म्हणून निफाडकर नागरिकांनी आमच्या वरती विश्वास दाखवला आहे नगरसेवकांनी आता नगराध्यक्ष म्हणून काम करण्याचे भाग्य मिळाले या जोरावर सर्वांना सोबत घेत हायटेक निफाड करणार लोकांच्या प्रश्नांना सोबत घेऊन त्याची सोडवणूक करत निफाड गावाचा सर्वांगीण विकासासाठी तत्पर राहणार
– विक्रम दादा रंधवे , युवा सेना जिल्हाध्यक्ष
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम