भारती आहेरांची जबाबदारी वाढली ; नगराध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांदी

0
35

देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच असतांना, कोण नगराध्यक्ष होणार याकडे लक्ष लागून होते, नामांकन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व्यांचे अंदाज चुकवत एकमेव अर्ज भारती अशोक आहेर(माजी जि प सदस्य ) यांचा आल्याने त्या बिनविरोध झाल्या , त्यांच्या निवडीने निष्ठेला न्याय मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली.

देवळा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नगराध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागून होते, ‘द पॉईंट नाऊ’ ने दिलेल्या बातमीवर शिक्का मोर्तब झाला व भारती आहेर ह्याच देवळ्याच्या कारभारीन असल्याचे स्पष्ट झाले.

10 महिन्यांचे रोटेशन असण्याची देखील चर्चा आहे मात्र याबद्दल अधिकृत माहिती पक्षाकडून देण्यात आलेली नाही. असे झाल्यास पुढचा नगराध्यक्ष कोण याकडे लक्ष लागून असेल.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here