द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्न तसे नवे नाहीत, तालुक्यातील अनेक भागात दुर्दशा झालेली आहे. उमराणे-कुभार्डे मनमाड रस्ता सदर रस्त्यावर सुमारे गुडघ्या इतका खड्डा पडलेला आहे. याबाबत PWD विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात प्रहार संघटनेने आणून दिले आहे. मात्र अद्याप सदर विषयी दखल घेतल्याचे आढळून येत नसल्याचे चित्र आहे.
रस्त्यांची परिस्थिती विदारक असून दुर्घटना होण्याची शक्यता जास्त आहे. या रस्त्याने कांदा उत्पादक ट्रॅक्टर चालक मोठे वाहन चालक मोटारसायकल चालक जीव मुठीत घेऊन कसरतीचा सामना करून सदरील रस्त्यावरील खड्डे पार करताना दिसतात. सबब विषयी संबंधित विभागाने त्वरीत दखल घेऊन तत्पर कार्यवाही करून नागरिकांचा जीवन मरणाचा खेळ थांबवावा. अन्यथा देवळा तालुका प्रहार संघटनेच्या माध्यमातून प्रहार स्टाईल आंदोलन छेडले जाईल असा इशारा संजय दहिवडकर यांनी दिला आहे.
प्रशासन सुस्त तक्रारी करूनही दुर्लक्षच असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. याबाबत प्रहारने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने आता तरी प्रशासन जागे होते का हे बघणं महत्वाचे असेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम