पेठ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’

0
41

पेठ प्रतिनिधी : पेठनगरपंचायती वर राष्ट्रवादीचे घड्याळ चालले असून नगराध्यक्षपदी करण करवंदे यांचीवर्णी लागली आहे. तर उपाध्यक्षपदी माकपाचे अफरोजा शेख यांची निवड करण्यातआली आहे.

पेठनगर पंचायतीत राष्ट्रवादी -८, शिवसेना -४, माकप -३, भाजप-१ ,अपक्ष -१ याप्रमाणे नगरसेवक आहेत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून करण करवंदे, आणि शिवसेनेकडून मनोज घोंगे यांनी अर्ज दाखल केले होते.आज नगराध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली त्यात राष्ट्रवादीचे करण करवंदे यांची नगराध्यक्षपदी व माकपाच्या अफरोजा शेख यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

याप्रसंगी नामदेव हलकंदर, इंद्रजीत गावित, राजू शेख, गणेश वळवी, मनोज घोंगे , राहुल चोथवे, युवराज लिमले, लता गायकवाड, छाया हलकंदर, विजय धूम, अबेदिन शेख, इमरान शेख, जावेद शेख , इनायत शेख, संकेत नेवकर, प्रवीण संगमनेरकर यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here