अकाउंट आणि फायनान्सच्या मिटिंगला विद्यार्थ्यांना बोलवा ‘रयत’ आक्रमक

0
38

पुणे प्रतिनिधी : अकाउंट आणि फायनान्सच्या मिटिंगला विद्यार्थ्यांना बोलावण्याबाबत सर्व विद्यार्थ्यांना 24 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमरण उपोषणा नंतर रविराज काळे आणि ऋषिकेश कानवटे रयत शिक्षण संस्थेत चर्चेसाठी गेले असता रयत चे सहसचिव प्रतिभा गायकवाड व सहसचिव संजय नागपुरे तसेच संस्थेचे ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दाला जागा असे पत्र विठ्ठल शिवणकर सचिव ,रयत शिक्षण संस्था यांना रयत ने दिले आहे.

चर्चेदरम्यान बोलणे झाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पुढील 4 वर्ष शॉर्ट टर्म कोर्सेस मोफत चालवले जातील असे आश्वासन दिले व फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या अकाउंट आणि फायनान्सच्या होणाऱ्या बैठकीसाठी होणाऱ्या बैठकीसाठी विद्यार्थ्यां मधून दोन प्रतिनिधी बोलावून विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडता येतील असे तिन्ही मान्यवरांनी आश्वासीत केले, विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना पञ पाठवून बोलावले जाईल हे आम्ही लेखि मागताच सहसचिव प्रतिभा गायकवाड यांनी मुलांनो आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही आमच्या मुलांसारखे आहात त्यांच्या विनंतीला मान देऊन फक्त एक लेखी आणि एक तोंडी आश्वासनावर आम्ही आमचे आमरण उपोषण स्थगित केले असा आरोप रयतने केला आहे.

फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या अकाउंट आणि फायनान्सच्या बैठकीस विद्यार्थी प्रतिनिधींना बोलवावे असे न झाल्यास सर्व विद्यार्थ्यी पुन्हा मोठ्या संस्थेने मार्च महिन्यात आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाच मार्ग पत्कारतील असा इशारा संघटनेने दिला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here