नाशिक प्रतिनिधी : जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकी नंतर नगराध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागुन आहे. सर्वाधिक नगरसेवकांची संख्या ही भाजपाची असली तरी निवडणुकीनंतर शिवसेना,राष्ट्रवादी,व काँग्रेस ही महाविकास आघाडी एकत्र आल्याने भाजपाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
सुरगाणा येथील नवनिर्वाचित भाजपा नगरसेविकेचा मृत्यू झाल्याने मंगळवारी पंधरा तारखेला होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या अडचणीत वाढ होणार असून भाजपाचे 8 तर राष्ट्रवादीचा 1 शिवसेनेचे 6 माकपचे 2 असे बलाबल आहे. त्यात भाजपच्या एका नगरसेवकाचा मृत्यू झाल्याने येत्या पंधरा तारखेला या निवडणुकीवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागून आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा या ठिकाणी कस लागणार असून आहेर काय खेळी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, भाजपचा नगराध्यक्ष होईल असे सूतोवाच केदा आहेर यांनी दिल्याने नेमकं ते कोणाला गळाला लावणार याकडे लक्ष लागून आहे.
सध्या सुरगाण्यात रस्सीखेच सुरू असून शिवसेनेची सत्ता उलथवून भाजपाने सत्तेचे स्वप्न बघितले मात्र नागरसेविकेच्या मृत्यूनंतर भाजपाला धक्का बसला आहे. मात्र भाजपा या ठिकाणी सत्ता स्थापन करेल असा दावा भाजपाने केला आहे. यामुळे 15 तारखेला काय होणार याकडे लक्ष लागून आहे. पुन्हा सेना सत्ता स्थापन करणार की भाजपा आपला विजयी झेंडा रोवणार हे येणाऱ्या 15 तारखेलाच समजेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम