सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : आदिवासी दुर्गम डोंगराळ भागातील होतकरू गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्ञानगंगा व अमृतवाहिनी ठरलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १२ विचा विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले आई वडील आणि आपले गुरुजन वर्ग यांचे मार्गदर्शन संस्कार आत्मसात करून उद्याच्या भावी आयुष्यात एक चांगला सनदी अधिकारी,कलेक्टर, डॉक्टर, वकील,प्रगतिशील शेतकरी, पी एस आय,आय पी एस, एक उत्तम खेळाडू यांसह आपापले करिअर साध्य करण्यासाठी चांगला अभ्यास केला पाहिजे ,मी देखील याच शाळेतील माजी विद्यार्थी असून आज याच शाळेतील निरोप समारंभ कार्यक्रम व्यासपीठावर बोलतो आहे ही सर्व ऊर्जा आत्मविश्वास, प्रेरणा या शाळेतील आदर्श शिक्षक वर्गाने आम्हांला दिली.शालेय जीवनात जुन्या गोष्टी आठवणींना साद घालत शिक्षक वर्गाचे अनमोल मार्गदर्शन यांची उजळणी करत सर्व अनुभवांना उजाळा देत सर्वांना साद गवसणी घालत सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, सामाजिक कार्यकर्ते रतन नाना बांबळे, केंद्रप्रमुख कैलास भवारी,विद्यालयाचे प्राचार्य टी जी साबळे आदींसह बहुसंख्य शिक्षक विद्यार्थी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्राचार्य तुकाराम साबळे यांनी विद्यार्थ्यांना 12 वी परिक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी समस्यांवर अनमोल आत्मविश्वास वाढविणारे मार्गदर्शन केले तर उपसरपंच रामचंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेसंदर्भात असणारी भिती दूर करण्यासाठी व चांगला अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन केले यानंतर सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे यांनी निरोप समारंभ कार्यक्रमाचा सार विद्यार्थ्यांना विश्लेषण करून सांगितले प्रत्येकाने कार्यक्रमातून काहीतरी ऊर्जा घेतली पाहिजे व आत्मविश्वासाने अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे.
यावेळी 12 वीच्या विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद यांचा पेन गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान केला.या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल असलेले प्रेम,शिक्षकांबद्दल असलेला आदर,जिव्हाळा आपल्या भाषणातून व्यक्त केला.अनेक विद्यार्थ्यांनी भावुक होत शाळेतील सर्व शिक्षकांचे ऋण व्यक्त केले. यानंतर नाशिक येथील इन्स्टिट्युट ऑफ पॅरामेडिकल मधून
Mpsc ,upsc संदर्भात विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन करण्यात आले.
देशसेवा ,आत्मिक समाधान, चांगलं आयुष्य,चांगला पैसा, चांगलं करिअर या संधींना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे. यावेळी व्यासपीठावर म्हस्के,मतकर, शेख,खापरे,बोडके,अनारसे,साबळे,नाडेकर, बहिरट,शिंदे,वालकोळी,ढोरकूले,चिंधे, पाटील आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षकांसमवेत सेल्फी,फोटो काढण्याचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसायनशास्त्र शिक्षक चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन इंग्लिश विषयाचे जेष्ठ शिक्षक अरुण मुंडे यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम