पुणे प्रतिनिधी : कोविडच्या पार्श्वभूमीवरपरीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन यासंदर्भात अनिश्चितता निर्माण झालेली होती, शासनाच्या निर्णयानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) मार्गदर्शक तत्वे जारी केले असून पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार आहेत. त्याआधी सरावासाठी मॉक टेस्टची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करुन दिलेली आहे.
ही परीक्षा ५० गुणांची होणार आहे यासंदर्भात विद्यापीठाने जारी केलेल्या सूचनापत्रात म्हटले आहे, विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रथम वर्ष ते अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२१ या परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन केले आहे. फेब्रुवारी – मार्च या महिन्यात टप्याटप्याने या परीक्षा घेतल्या जाणार असून १५ फेब्रुवारी पासून या परीक्षा पार पडणार आहेत. परीक्षा फक्त ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नाद्वारे होणार असून त्यासाठी एक तासाचा कालावधी असेल. पन्नास गुणांसाठीच्या या परीक्षेत साठपैकी पन्नास प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरली जातील, असेही नमूद केले आहे.
निकाल 48 तासात…..!
विद्यार्थ्यांना 48 तासात गुणपरीक्षेनंतर पुढील ४८ तासांत गुण स्टुडंट प्रोफाइल सिस्टीममध्ये उपलब्ध करुन दिले जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील पाच दिवसांच्या आत अडचणी व शंका असल्यास तक्रार नोंदविता येईल. स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये नोंदविलेल्या तक्रारीच ग्राह्य धरल्या जातील, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम