द पॉईंट नाऊ ब्युरो : पुष्पा हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतो आहे. तो त्याच्या फेमस अशा गाण्यांमुळे आणि डान्समुळे. मात्र या पुष्पा मधीलच हेअर स्टाइलच्या कारणाने चक्क चोरीतील आरोपिलाच अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यामधील डांबर खेडा इथल्या हरचंद कोळी यांचे पन्नास हजार रुपये चोरीला गेले. आणि या प्रकरणातील चोराचा छडा लागला तो चोराने आपल्या डोक्यावर पुष्पा नाव कोरलेल्या हेअर कटमुळे.
पोलिसांना याबाबत तपास करण्यास सुरुवात केली. आणि त्यातून तळोदा इथल्या विनोद पवार नावाच्या युवकाने असा पुष्पा नावाचा हेअर कट केला असल्याचे समजले.
या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या दोघांनीही गुन्हा कबूल केला असल्याचे सांगण्यात येत आहे. चोरीचा हा लागलेला अनोख्या प्रकारचा छडा चर्चेचा विषय बनलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम