चांदवड प्रतिनिधी : चांदवड येथील नॅक मानांकित ‘ अ ’ दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिति व भारतीय जैन संघटना यांचे संयुक्त विद्यमाने ३ व ४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय स्मार्ट गर्ल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत स्वाभिमान, आत्मभान, स्वसंरक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, निवड आणि निर्णय, संवाद आणि संबंध अशा विविध महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. एकूण ६८ विद्यार्थिनींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यशाळेत भारतीय जैन संघटनेतर्फे श्रीमती. पारूल दिवाणी आणि श्रीमती उर्मी झलावत यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेचे आयोजन प्रा. योगीता राठोड यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम आर संघवी व अंतर्गत तक्रार निवारण समितिच्या अध्यक्षा प्रा. श्रीमती. कैंजन संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल विश्वस्त समितेचे अध्यक्ष श्री. बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा,उपाध्यक्ष श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, तसेच महाविद्यालयाचे समन्वयक श्री. झुंबरलालजी भंडारी व श्री. सुनीलकुमारजी चोपडा आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम