द पॉईंट नाऊ ब्युरो : आरोग्य विभागाच्या भरती घोटाळ्यातील प्रमुख म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. अतुल प्रभाकर राख असं त्याचं नाव आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या ‘क आणि ‘ड’ वर्गाच्या परीक्षांच्या तारखा ठरल्या. मात्र या परीक्षा परिक्षांसारख्या होऊच शकल्या नाहीत. दोन्ही परीक्षांचे पेपर फुटल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले.
या घोटाळ्यातील मुख्य आरोपी हा जीवन सानप आहे. ज्याच्या सर्व ऍक्टिव्हिटी अतुल राख करत होता. याच अतुल राखला पुण्यातून पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणात अजून कोणाचे नाव समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम