आठ लाखांची लाच घेणाऱ्या ‘झनकरबाईंना’ जामीन मंजूर

0
41

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या आठवड्यात राज्यभर गाजलेले प्रकरण शिक्षण विभागातील लाचखोरीने प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी झनकर यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

एका शिक्षण संस्थेला नियमित वेतन सुरू करण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अडकलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना अखेर आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, मात्र प्रत्येक सोमवारी झनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे येथील एका शिक्षण संस्थेतील शिक्षकांना अनुदानित वेतन नियमीत करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेताना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्या वाहनचालकास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांचे नाव सांगितल्याने त्यांची चौकशी करण्यात आली होती. यासोबतच प्राथमिक शिक्षकाचाही यात समावेश असल्याने त्याची देखील चौकशी होऊन कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, सहआरोपी असलेल्या ज्ञानेश्वर येवले आणि पंकज दशपूते यांना गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here