विशेष प्रतिनिधी : चांदवड मंगरूळ हद्दीत असलेल्या सातमाळा डोंगर रांगेत असलेल्या डोंगराला रात्रीच्या वेळी पुन्हा भीषण आग लागली असून “आम्हाला जाळणाऱ्याचां कोणीतरी शोध घ्या, वृक्ष मागताय जीवनदान ! असे चित्र आज बघावयास मिळत आहेत, बराच डोंगर जाळून खाक झाला असून लहान मोठ्या झाडांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. पावसाळा संपला असताना पावसाळ्यामध्ये जी झाडेझुडपे मोठी होतात व जीवदान पकडतात अशाच झाडाझुडपांना मोठे व्हायचे स्वप्न पडण्याच्या आधीच त्यांचे जळून खाक होऊन झाल्याचे आपल्याला दिसत आहे.
अवघ्या 4 ते 5 दिवसांपूर्वी असेच डोंगराला आग लागून बरेच नुकसान झाले होते.याप्रमाणे देखील आज साधारणता हजारो- लाखो रुपयांचे नुकसान झालेले असल्याचे समजते राज्य शासन व केंद्र शासन वृक्ष लागवडीवर कोटी रुपये खर्च करून “झाडे लावा, झाडे जगवा” या वृक्ष संवर्धनाच्या योजना राबवत असताना ओसाड पडलेले डोंगर यामध्ये अशा रात्रीच्या वेळी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन आग लावत असेल तर याला आळा घालणे खूपच गरजेचे झाले आहे. यासाठी सर्वस्व जबाबदारी ही वन विभागाची असून वन विभाग काय पाऊल उचलले यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आज रोजी दि.09/02/2022 रोजी संध्याकाळी कं. न.559 मधिल गवताचे ठिकाण असलेल्या काही भागात अचानक आग लागल्याचे दिसून आले लगेच स्थानिक गावकरी व रेंज स्टाफ सह आग लागल्याचे ठिकाणी जावून आग विझविली.
-आर.एफ.ओ. संजय वाघमारे चांदवड
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
मागिल चार वर्षांपासून असाच प्रकार सुरु आहे .पेटलेला डोंगर विझल्यानंतर पुन्हा कोन्या अज्ञान इसामाद्वारे पेटवले जाते .जंगलाची राखरांगोळी करण्याची पुर्ण तयारी करण्यात आली आहे .हे आपण समजले आहे
मागिल चार वर्षांपासून असाच प्रकार सुरु आहे .पेटलेला डोंगर विझल्यानंतर पुन्हा कोन्या अज्ञान इसामाद्वारे पुन्हा आग लावली जाते .जंगलाची राखरांगोळी करण्याची पुर्ण तयारी करण्यात आली आहे ……………. ……………,
मागिल चार वर्षांपासून असाच प्रकार सुरु आहे .पेटलेला डोंगर विझल्यानंतर पुन्हा कोन्या अज्ञान इसामाद्वारे पुन्हा आग लावली जाते .जंगलाची राखरांगोळी करण्याची पुर्ण तयारी करण्यात आली आहे ……………. ……………,