गुऱ्हाळे येथे श्री कानिफनाथ महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

0
37

चांदवड प्रतिनिधी : चांदवड तालुक्यातील गुऱ्हाळे येथील भवर – पाटील वस्तीवर असलेल्या कानिफनाथ महाराज मंदिराच्या ३ वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार (दि.११) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी खंडेराव भवर व परिवाराने केले आहे.

यानिमित्त शुक्रवार (दि.११) रोजी सकाळी ७ वाजता होमहवन तर १० वाजता पाथर्डी येथील अवलीनाथ संस्थान गर्भगिरी येथील हभप महादेव महाराज आठरे यांचा हरी किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी रेडगावचे गायनाचार्य हभप नवनाथ महाराज चव्हाण, मकरंदवाडीचे गायनाचार्य हभप अक्षय महाराज वाघ व वावीचे मृदंगाचार्य हभप महेश जगताप उपस्थित राहणार आहे. कीर्तनानंतर श्री कानिफनाथ महाराजांची महाआरती होऊन कार्यक्रमास आलेल्या नाथभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा गुऱ्हाळे पंचक्रोशीतील नाथभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रामकृष्ण भवर, नामदेव भवर, पंढरीनाथ भवर, वसंत भवर, खंडेराव भवर, राजाराम भवर, दिनकर भवर, शरद भवर, भरत भवर आदींनी केले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here