कळवण प्रतिनिधी : कळवण बाजार समिती अंतर्गत अभोणा ,कनाशी उपबाजार समिती मध्ये, हमाल माथाडी कामगारांच्या अन्यायाविरोधात प्रहार हमाल माथाडी कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली यावेळी नाट्यमय घडामोडी घडल्या असून कळवण बाजार समितीच्या सभापती व कमिटी मेंबर यांनी विरोध करत पोलीस प्रशासन बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
नाशिक जिल्हाप्रमुख अनिल भाऊ भडांगे उपजिल्हा प्रमुख कृष्णाजी जाधव, जिल्हा संघटक दिलीप पाटील, शहर संघटक संजय तिवडे, कळवण तालुका अध्यक्ष , कन्हैया जाधव, युवा नेते अमोल अडांगळे तसेच सर्व हमाल माथाडी कामगारांच्या सहकार्याने युनियन ची स्थापना करण्यात आली.
यावेळी माथाडी कामगार युनियन च्या फलकाचे अनावरण करताना प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भंढागे यांनी सांगितले की आम्ही श्रमिक, कष्टकरी , कामगार यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू च्या आदेशानुसार काम करत असताना आम्हाला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही असं ठामपणे सांगितले.
प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष क्रुष्णा जाधव यांनी सांगितले की , आम्ही सनदशीर मार्गाने कामगारांच्या विनंती ला मान देऊन फक्त माथाडी कामगार युनियन च्या वार्ता फलकांचे अनावरण करण्यासाठी आलो असंता आम्हाला विरोध करण्यासाठी बाजार समिती ने दादागिरी करून पोलिस बळाचा वापर करून विरोध करावा ही बाब बाजार समितीच्या नाव लौकिकाला साजेशी नाही ,अशा पद्धतीने दडपशाही करून आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवुन घेतला जाणार नाही , असा इशारा जाधव यांनी दिला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम