शहर विद्रूप करणाऱ्या ‘ड’ प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करा रयत ची मागणी

0
44

पुणे प्रतिनिधी : रयत विद्यार्थी परिषदेने अर्ज करून पिंपरी शहरामध्ये इंदोर पॅटर्न राबवण्यासंदर्भात जे काम सुरू आहे ते इंदोर पॅटर्न अंतर्गत शहरातील भिंती रंगवण्याचे काम इतरही स्वच्छतेच्या व अनधिकृत फ्लेक्स काढण्याचे काम करत आहेत. पंरतु इंदोर पॅटर्नचा विसर अधिकाऱ्यांना पडल्याचा आरोप रयतने केला आहे.

भरारी पथकामार्फत शहर विद्रूपीकरण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या. त्यामध्ये द पॅथॉलाजी लॅब वर सार्वजनिक ठिकाणी व महानगरपालिकेच्या मिळकतींवर अनधिकृत पोस्टर लावल्यामुळे संबंधित लॅबला 25 हजार दंड आकारण्यात आला. परिसर विद्रूपीकरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मग ड प्रभागाची मुख्य इमारतीवर जाहिर झालेली प्रभाग रचना चिटकवून मनपाची इमारत विद्रूपीकरण करण्याचे काम ड प्रभाग अधिकाऱ्यांनीच केली आहे. त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हा प्रश्न उपस्थित केला आहे.

कायदयाच्या नियमावर बोट ठेवून नेहमीच सर्वसामान्य जनतेची दंडात्मक कारवाई करुन लुट होते. याच नियमांवर बोट ठेवून आपल्या अधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाई केली जाईल का ? संबंधीत सर्व प्रकारचे फोटो व व्हिडिओ आयुक्तांना देत कारवाईची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई न झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा संघटनेने दिला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here