काय सांगता , हरवलेली पत्नी चक्क पाच वर्षांनी भेटली ….. ‘कुली’च्या प्रेम कथेची सध्या सर्वत्र चर्चा

0
23

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : हरवलेली पत्नी चक्क पाच वर्षांनी सापडली. ही महिला हरवली पंजाब मध्ये मात्र सापडली पुणे येथे, पंजाब मधील अट्टारी येथे सैन्य दलातील एका कुलीची पत्नी 5 वर्षांपूर्वी हरवली होती. त्याने भरपूर शोध घेतला मात्र ती काही गेल्या पाच वर्षे सापडली नाही. ती महिला नुकतीच पुण्यातील येरवडा येथील मनोरुग्णालयात सापडली आहे.

आपली पत्नी हरवाक्याचे ओझे घेऊन पाच वर्षे हा कुली जगला दरम्यान च्या काळात पती आणि त्यांच्या नातेवाईकांनी पत्नीला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. पत्नीवरील अफाट प्रेमामुळे कुलीने दुसरा विवाह करण्यासही नकार दिला. पत्नी कधी तरी सापडेल अशी त्यांना आशा होती. आणि ही आशा पाच वर्षांनंतर पूर्ण झाली त्याला त्याची पत्नी पुण्यातील मनोरुग्णालयात सापडली.

कुलीच्या पत्नी पंजाबमधील अमृतसरमध्ये मानसिक आजारावर उपचार घेत होत्या. दरम्यान तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर काही दिवस ती महिला तणावाखाली होती. या तणावामुळेच महिला रेल्वेत बसून अज्ञात ठिकाणी आल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी पालघर पोलिस ठाण्यातून ठाणे मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना दोन वर्षांपूर्वी येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले होते, येथील समाजसेविका प्रविना देशपांडे यांनी मेहक सोबत संवाद साधला. पंजाबी भाषेतून त्या केवळ फौजी, कुली, अट्टारी अशा शब्दांचा उल्लेख करीत होत्या. देशपांडे यांनी अमृतसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी राजसिंग यांच्याशी संपर्क केला. त्यांनी मोबाईलवर कुलीच्या पत्नीचे छायाचित्र घेऊन त्यांनी ते समाज माध्यमावर व्हायरल केले. त्यामुळे पत्नीचा  ठावठिकाणा सापडला, पती पत्नीने एकमेकांना पाहताच  त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

ही घटना अतिशय वेगळी असून एकमेकांना आपल्याबद्दल असलेली ओढ हे प्रेमाची मोठी ताकद आहे. कुली दुसरं लग्न करू शकला असता मात्र त्याने तस केलं नाही. व आपल्या पत्नीच्या परत येण्याच्या आशेवर राहीला.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here