द पॉईंट नाऊ ब्युरो : नवरदेवासोबत लग्न झालं. वऱ्हाड नवरीला घेऊन निघालं. मात्र रस्त्यात नवरीला टॉयलेटला जाण्याचं निमित्त झालं आणि तिने थेट आपल्या प्रियकरासोबत पळच काढला. हो. हा प्रकार घडला आहे, छत्तीसगडच्या बस्तरमध्ये.
एका नवरदेवाने आपल्या नववधूला लग्न करून, घरी न्यायला प्रवास सुरू केला. मात्र बहुदा नवरी आणि तिच्या प्रियकराने आधीच प्लॅन केलेला असावा की काय, राजनंद गावातील मानपूरजवळ पोहोचल्यावर ना नवरीने टॉयलेटच्या बहाण्याने आपल्या प्रियकरासोबत पळ काढला. शेवटी मानपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, या पळून गेलेल्या दोघांचा शोध लागला आणि सगळा प्रकार उघडकीस आला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम