देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यात आज महाराजस्व अभियाना अंतर्गत सर्व मंडळाच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार फेरफार अदालत घेण्यात आली. देवळा, उमराने, लोहणेर व खर्डे ठिकाणी फेरफार अदालत घेण्यात आली .सदर फेरफार अदालत मध्ये फेरफार नोंदी ,सातबारा तसेच उत्पन्नाच्या दाखल्यांचे वितरीत करण्यात आले .
याप्रसंगी मंडळ अधिकारी आर डी परदेशी, हिरे, बागुल, व तलाठी उपस्थित होते .फेरफार अदालत प्रसंगी उपस्थित राहून नागरिकांनी सेवेचा लाभ घेतला .दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी फेरफार अदालत घेण्यात येणार आहे . नागरिकांनी सदर ठिकाणी उपस्थित राहून फेरफार नोंदी, 7/12 आदी कामी लाभ घ्यावा ,असे आवाहन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम