चांदवड पोलिसांनी खुनाच्या गुन्हातील आरोपीच्या १२ तासात मुसक्या आवळल्या

0
41

नितीन फंगाळ,
चांदवड प्रतिनिधी : लासलगाव ते मनमाड रोडच्या बाजुला , वागदर्डी धरणाजवळ , पडीत जागेवर चांदवड पोलीस स्टेशन हददीत अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तिक्ष्ण हत्याराने जिवे ठार मारल्याने चांदवड पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजि . नं . । ४७ / २०२२ भादवि कलम ३०२ प्रमाणे दिनांक ०७/०२/२०२२ रोजी अज्ञात इसमा विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .

पोलीस अधिक्षक , नाशिक ग्रामीण श्री . सचिन पाटील यांनी सदर घटनेबाबत तात्काळ दखल घेवुन अज्ञात आरोपी यांना तात्काळ अटक व खुनाचा तपास लवकरात लवकर करणेबाबतचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा व चांदवड पोलीस यांना दिले होते . पोलीस अधिक्षक , नाशिक ग्रामीण श्री . सचिन पाटील यांना चांदवड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या खुन्याच्या गुन्हातील आरोपींची गुप्तबातमीदाराकडुन बातमी मिळताच त्यांनी सदरची बातमी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील , नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक समीर बारावरकर , नेमणुक – चांदवड पोलीस स्टेशन यांना सांगुन तात्काळ कार्यवाही करणेबाबतचे आदेश दिले .

पोलीस अधिक्षक , नाशिक ग्रामीण यांचे आदेशाप्रमाणे व बातमीप्रमाणे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व समीर बारावरकर यांनी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस अधिक्षक , नाशिक ग्रामीण यांना मिळालेली गुप्तबातमी कळवुन तात्काळ कार्यवाही करणेबाबत सांगितले असता , पथकांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे मनमाड चांदवड रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेल्या संशयीत इसतांची माहिती घेवून गंगावे ता . चांदवड येथे जावुन आरोपी नामे दत्तात्रय विश्वनाथ उबाळे यांची चौकशी केली असता आरोपी हे गावात असल्याचे त्यांचे प्राथमिक चौकशी मध्ये निष्पन्न झाले . पथकाने तात्काळ गंगावे गावात आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे दत्तात्रय विश्वनाथ उबाळे हा गावात मिळुन आला , त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दत्तात्रय विश्वनाथ उबाळे सांगितले .

पोलीस पथकाने त्याचे कडे गुन्हयातील मयत नामे अनिल रतन आहिरे याचेबाबत चौकशी केली असता आरोपीने उडवाउडवीचे उत्तरे दिली असता पोलीस पथकाला त्यांची शंका आल्याने गुन्हयाबाबत आरोपी यांचेकडे सखोल चौकशी केली असता आरोपी नामे दत्तात्रय विश्वनाथ उबाळे याने गुन्हा केल्याची कबुली दिली . चांदवड पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असुन आरोपीतास गुन्हयाच्या पुढील तपासाकरीता ०५ दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे . मा . पोलीस अधीक्षक श्री . सचिन पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक / समीर बारावरकर हे पुढील तपास करीत आहे . सदर कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक हेमंत पाटील , समीर बारावरकर , सपोनि सागर शिंपी , पोउपनि संदिप पाटील , मुकेश गुजर , सहापोउपनि / विठठल बागुल , पोहता सोनवणे , पोना लोखंडे , गांगुर्डे , पोकॉ कुणाल मोरे व चांदवड व मनमाड पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथक हे सामिल होते .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here