हिरे महाविद्यालयात डॉ.अपूर्व हिरे यांच्या हस्ते राष्ट्रीय छात्र सेनेचा अमोल गांगुर्डे यांचा गौरवपूर्ण सन्मान

0
25

नाशिक प्रतिनिधी : २६ जानेवारी २०२२ रोजी दिल्ली येथे झालेल्या राजपथावरील संचलन सोहळ्यात लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील कु. अमोल गांगुर्डे याने विशेष प्राविण्य मिळविल्या याबद्दल महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे समन्वयक मा. डॉ. अपूर्व हिरे यांनी प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह व दहा हजार रुपयांची स्कॉलरशिप देऊन एन. सी. सी. छात्र अमोलचा गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ.अपूर्व हिरे यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विकासात नेतृत्व, वक्तृत्व, ज्ञान आणि मूल्ये यांची सांगड घालत एन.एस.एस. छात्रचा विकास करण्याचा प्रयत्न अभिरूप आहे. यशस्वी व्हायचे असल्यास प्रामाणिकपणा आणि चिकाटी असणे गरजेचे आहे. हे सर्व गुण बालपणापासूनच आत्मसात करुन विधार्थी घडत असतात. सामाजिक वातावरणात सक्रिय असल्यास एन. सी. सी. छात्रची विचारधारा तयार होते. देशाची मूल्ये जपण्याचे कार्य या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत डॉ. हिरे यांनी सांगितले. यावेळी मा. डॉ.अपूर्व हिरे यांनी एन सी सी छात्र अमोलने घेतलेल्या प्रशिक्षणा बद्दल अधिक माहिती जाणून घेतली. त्याच्या कठोर परिश्रमामुळेच यश मिळत त्याच्या या यशाबद्दल पाठीवर कौतुकाची थाप देऊन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रंसगी अमोलच अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

२ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडलेल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या तुकडीच्या सत्कार समारंभ नुकताच मुबई येते पार पडला. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात ‘पंतप्रधान ध्वज (पीएम बॅनर)’ मिळविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या तुकडीचा सन्मान केला. संचालनालयात महाविद्यालयाचा एन. सी. सी. छात्र कु. अमोल गांगुर्डे महाराष्ट्राच्या मुबई येथे पार पडलेल्या सत्कार समारंभात *“पंतप्रधान ध्वज”* चा मानकरी ठरला. संचलन शिबिरादरम्यान अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट जवानांचा आणि पारितोषिक विजेत्यांचा पारितोषिके देऊन सन्मान केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषविले आणि छात्र सेनेच्या जवानांशी संवाद साधला. या प्रसंगी राज्यमंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि अदिती तटकरे, राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, ग्रुप कमांडर्स, अधिकारी आणि इतर कर्मचारीवर्ग देखील उपस्थित होता.

महाविधालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे उपप्राचार्य डॉ. एन. बी. पवार, डॉ. सुचेता सोनवणे, सौ संगीता प्रकाश गांगुर्डे व एन सी सी अधिकारी लेफ्टनंट सचिन एन. सोनवणे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व एन. सी. सी अधिकारी लेफ्टनंट सचिन एन. सोनवणे यांचे मार्गदर्शन अमोलला लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य विधार्थी हिताचा विचार करुन अडी-अडचणी सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्यामूळे अमोलच यश हे महाविद्यालया दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here