द पॉईंट नाऊ ब्युरो : सांगली जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने दोघा माय-लेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जत तालुक्याच्या जाडरबोम्बलाद येथे शेतात असलेल्या विजेच्या बाईंडिंग वायरचा शॉक लागल्याने दोघा मायलेकी जीवाला मुकल्या. मुलीचे नाव विद्या संजय हेळवार आणि आईचे नाव सुवर्णा परसाप्पा हेळवार आहे.
विद्या ही आपल्या माहेरी आलेली होती. तिच्या आईचे कुटुंब शेतात राहते. दरम्यान या भागात शेतकऱ्याने डुकरांची वर्दळ टाळण्यासाठी तारेचे कुंपण केलेले होते. विद्या ही बाहेर आलेली असता, तिला शेतात पडलेल्या बाईंडींग तारेचा विजेचा धक्का लागल्याने ती ओरडली आणि तिला वाचवण्यासाठी तिच्या आई धावून आल्या. मात्र त्यांना देखील विजेचा धक्का लागल्याने दोघी मायलेकी जागीच मृत्युमुखी पडल्या. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम