ऑनलाइन वाद विवाद स्पर्धेत देवळा महाविद्यालयाचे यश

0
32

देवळा प्रतिनिधी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नाशिक जिल्हा एड्स नियंत्रण विभागातर्फे ऑनलाइन वाद-विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली. वादविवाद स्पर्धेत “उच्च माध्यमिक (वर्ग ८, ९ व १०) शाळेतील विद्यार्थ्यांना एच. आय. व्ही. एड्स संक्रमणाचे कोणते मार्ग आहेत याविषयी शिक्षण देणे योग्य की अयोग्य” या विषयावर स्पर्धा झाली.

ऑनलाईन झालेल्या या वाद-विवाद स्पर्धेमध्ये कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका कु. श्वेता शिंदे हिने प्रतिनिधित्व केलं. यामध्ये एड्स संक्रमणाचे मार्गाविषयी शिक्षण देणे योग्य या विषयी सविस्तर मुद्देसूद माहिती देऊन आपले कौशल्य दाखवत प्रभावी मुद्दे मांडले.

स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातून एकूण २३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा संपल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला, त्यात कु. श्वेता शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकाला रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी, जिल्हा पर्यवेक्षक सुनिता बोरसे, नरेंद्र पाटील, योगिता खंडागळे यांनी विजेत्या स्पर्धकाचे अभिनंदन केले. यशस्वी स्पर्धकाला रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर, देवळा ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक श्री प्रवीण देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here