नाशिक प्रतिनिधी : जिल्ह्यात कोरोना संख्या पुन्हा वाढत असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 59 रुग्ण करोनाबाधित झाले करोनाबाधितांची शहरातील संख्या सध्या 22 आहे. तर ग्रामीण भागात 35 नागरिक बाधित झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 1 हजार 2 नागरिक उपचार घेत आहेत.
हा आकडा गेल्या 24 तासात एकूण 59 रुग्ण बाधित झाले तर 63 रुग्णांनी करोनावर मात केलेली आहे. शहरात 22, ग्रामीण भागात 35, तर मालेगाव, जिल्हा बाह्य प्रत्येकी 1 रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 4 हजार 663 रुग्ण बाधित तर 3 लाख 95 हजार 100 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
आज 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून हे दोन्ही ग्रामीण कार्यक्षेत्रातील आहेत. शहर आणि मालेगाव कार्यक्षेत्रात एकही रुग्ण दगावला नसून एकूण बळींची संख्या 8 हजार 561 इतकी झाली आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम