32 वर्षीय तरुणाचा खून, घटनास्थळावरून चौकशी सुरू

0
40

नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : तालुक्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली असून लासलगाव मनमाड रस्त्यावर 32 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहे त्यामुळे लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे .

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास ‘ सुरू केल्यानंतर जनावरांच्या अवैध खरेदी – विक्रीतून अनिल आहिरे ची हत्त्या झालेली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे . दि.6/2/2022 रोजी रविवारी अनिल पिकावरील औषधे आणण्यासाठी मित्रा सोबत जात असल्याचे कारण सांगून गेला होता,मात्र रात्री तो परत आला नाही अशी माहिती त्याच्या भावाने पोलिसांनी दिलेली आहे. अनिल हा जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचा असेही त्याने पोलिसांना सांगितले . पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड पासून जवळ लासलगाव मार्गावर एक मृतदेह आढळून आल्याची महिती मिळाली होती.

या घटनेच्या ठिकाणी पोलीस उपधीक्षक समीरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक समीर बावरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव,सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते, गजानन राठोड, हरिश्चंद्र पाळवी , पवार, सौंदाणे, गोसावी,शेख, नरवटे,झालटे, खैरनार,चव्हाण, आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचा मृतदेह आढळून आलेला असून त्याच्या डोक्यावर , पोटावर, हातावर, धारदार हत्त्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आल्याचे निदर्शनास येते जवळच त्याची मोटारसायकल असून सोबत दारूच्या बाटल्या देखील पडलेल्या आहेत. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मयत तरुणाचे नाव अनिल आहिरे असून तो चांदवड तालुक्यातील पिंपळगाव (ढाबळी) येथील असल्याचे निष्पन्न झाले .पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन तर्फे चालू असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here