‘पुणे विद्यापीठा’च्या शांतिश्री पंडित बनल्या ‘जेएनयू’च्या पहिल्या महिला कुलगुरू

0
34

द पॉईंट नाऊ ब्युरो : दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठास पहिल्या महिला कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शांतिश्री धुलीपुडी पंडित या ‘जेएनयू’ च्या पहिल्या महिला कुलगुरू असणार आहेत.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ हे देशभरात नावाजलेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठात पहिल्या महिला कुलगुरु म्हणून नियुक्त झालेल्या शांतिश्री पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

जेएनयूचे आधीचे कुलगुरू जगदीश कुमार यांचा कार्यकाळ जानेवारी महिन्यात संपला आहे. याच पार्श्वभूमीवर आता नूतन कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे.

शांतिश्री पंडित या जेएनयू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी जेएनयू विद्यापीठातूनच एम. फील आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर पीएचडी केलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here