द पॉईंट नाऊ ब्युरो (गोंदया) : गोंदिया येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोंदियाच्या तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामण रहांगडाले यांच्या वाहनाचा आणि दुचाकीचा हा अपघात घडला.
अपघातात मंगेझरी येथील हिरदेसिंग टेकाम, कोडेबरा येथील संपत आहाके आणि प्रताप आहाके यांचा मृत्यू झाला आहे. हिरदेसिंग टेकाम आणि संपत आहाके यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रताप आहाके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे तिघेही जण हिरदेसिंग टेकाम यांच्या मुलाच्या लग्नाची तारीख ठरवून परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. तिरोडा – साकोली रोडवर सर्रा गावाच्या परिसरात हा अपघात घडला.
दरम्यान, या अपघातात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामण रहांगडाले देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम