सेवानिवृत्त जवान शरद आहेर यांचे मटाणे येथे जंगी स्वागत

0
181
 देवळा ; मटाणे येथील सेवानिवृत्त जवान शरद आहेर यांचा सत्कार करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा  : तालुक्यातील मटाणे येथील भूमिपुत्र हवालदार शरद आहेर हे २० वर्ष प्रदीर्घ देशसेवा करून तवांग (अरुणाचल प्रदेश) येथून सेवानिवृत्त झाले असून नांदगांव येथील हिरामण सोनवणे आणि धुळे येथील किशोर पाटील हे सैन्यातून सोबत सेवानिवृत्त झाले असून त्यांचे देवळा शहरात मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले .

देवळा ; मटाणे येथील सेवानिवृत्त जवान शरद आहेर यांचा सत्कार करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

सेवानिवृत्त ए.सी.पी. हवालदार शरद आहेर हे २००२ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. नशिराबाद येथे पहिली पोस्टिंग गेले. सुकणा, मेरठ येथे सेवा बजावली.२०११ मध्ये युनायटेड नेशन (शंतिसेना) लेबनान मध्ये निवड झाली. नागालँड, पुणे आणि तवंग येथून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त देवळा शहरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येऊन, यानंतर मटाने येथे मूळगावी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर, भाऊसाहेब पगार, जितेंद्र आहेर, अनिल आहेर, जी. प. सदस्या नूतन आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर, भाजपा सैनिक आघाडीचे अध्यक्ष मांगु लोखंडे, संस्थापक रोशन आहेर, खजिनदार कैलास पगार, सदस्य किसन आहेर, महेंद्र आहेर, संदीप पाटील, भाऊसाहेब आहेर आदींसह पंचक्रोशीतील सर्व आजी माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here