द पॉईंट नाऊ ब्युरो : भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात उद्या दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत निर्णय घेतला असून, राज्यात लता मंगेशकर यांच्या जाण्याने दुखवटा म्हणून हा सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशभरात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. दुखवटा म्हणून भारताचा राष्ट्रध्वज सर्व कार्यालयांत अर्ध्यावर आणला जातो. तसेच कोणतीही कामे यादरम्यान केली जात नाहीर. त्यात महाराष्ट्रात देखील आता सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम