राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकाऱ्यासही नाही आवरला भ्रष्टाचाराचा मोह

0
33

द पॉईंट नाऊ ब्युरो : एका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महिला पोलीस अधिकाऱ्याला लाच घेण्याचा मोह आवरता आला नाही. मुंबईच्या चेंबूर पोलीस ठाण्यातील आरोपीला जामीन देण्यासाठी 2 लाखांची खंडणी मागितली असल्याचे समोर आले आहे.

आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले जाते. मात्र हा पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकाऱ्यासही भ्रष्टाचाराचा मोह आवरला नाही. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रात आज भ्रष्टाचाराने आपले पाय पसरलेले आहेत.

राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा आणि अन्य दोघांनी जामिनासाठी 2 लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार आरोपीची बहीण शहिदा कुरेशी हिने केली आहे. यामुळे शालिनी शर्मा सह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here