‘300 रुपये दे दो, रिपोर्ट ले लो’

0
29

द पॉईंट नाऊ ब्युरो : ‘पैसे दे दो, रिपोर्ट लेलो’.. हो असच सध्या घडताना दिसून येत आहे. कोविडच्या कारणाने बऱ्याच प्रकारची बंधने पाळावी लागत असल्याने, नागरिक त्यातूनही पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

जळगाव येथे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पैसे दिले की, तुम्हाला तुमचा RTPCR रिपोर्ट त्वरित बनवून मिळतो. सुरक्षारक्षक राजू दुर्गे, डेटा एन्ट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील असे दोघेजण या प्रकारात सामील आहेत.

कोविड रिपोर्ट शिवाय आता जवळपास सर्वच ठिकाणी एन्ट्री बंद आहे. अर्थात, दोन्ही डोस पूर्ण असलेले कोविड सर्टिफिकेट, RTPCR रिपोर्ट अशा गोष्टींची आवश्यकता आता प्रत्येक ठिकाणी असते. त्याशिवाय कामे होऊ शकत नाहीत.

भ्रष्टाचार हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याने कोणत्याही क्षेत्राला सोडलेले नाही. आता तर या RTPCR रिपोर्ट मध्ये देखील हा प्रकार समोर येऊ लागला आहे. जळगाव येथे 300 रुपये देऊन हा खोटा रिपोर्ट बनवून दिला जात असल्याचे समोर आले आहे. संगणकीय प्रणालीत फेरफार करून Swab न घेता रिपोर्ट बनवून दिला जात होता. अशा प्रकारांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here