मोठा अनर्थ टळला ! ; गॅस सिलेंडरची गाडी झाली पलटी

0
39

नाशिक प्रतिनिधी : जिल्ह्यात आज मोठी दुर्घटना टळली असून पेठ रस्त्यावरील कोटंबी (Kotambi) गावाजवळ ‘आयशर’ ट्रक उलटल्याने ट्रकमधील गॅसच्या सर्व टाक्या रस्त्यावर विखुरल्या होत्या यामुळे एक मोटारसायकल स्वाराला धडक बसल्याने गंभीर जखम झाली असून एक किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेने मोठा अनर्थ टळला असला तरी अशी वाहतूक करत असतांना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, नाशिक-पेठ मार्गावरील (Nashik-Peth Road) कोटंबी (Kotambi) गावाजवळच्या हॉटेल कन्सारा जवळील वळणावर नाशिककहुन (Nashik) गुजरातकडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक एमएच १५, एचएच ३२५९ रस्त्यात उलटला. यामागील कारण अद्याप समजलेलं नाही, नेमकं चालकाचा ताबा सुटला की अन्य काही याबद्दल अजून माहिती नाही.

पलटी झालेल्या ट्रकमधील इण्डेन कंपनीच्या नवीन गॅसच्या टाक्या रस्त्यावर पसरल्या होत्या. त्याचवेळी औषधे पुरवठा करणाऱ्या युनिव्हर्सल कंपनीचे अधिकृत सेल्समन वैभव पुजारी (४८, काळाराम मंदिराजवळ पंचवटी, नाशिक) हे मोटारसायकलने नाशिककडे जात असताना त्यांच्या मोटर सायकलवरच टाक्या आदळल्या यामुळे पुजारी टाक्यांखाली दाबले गेले होते.

स्थानिक ग्रामस्थांनी व इतर वाहनचालकांनी टाक्या बाजूला करून त्यांना ओढून काढले. त्यांना तातडीने पेठच्या (Peth) ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच निरगुडे (क) येथील मानिक शांताराम चौधरी हेदेखील मोटारसायकलने जाताना त्यांच्याही गाडीवर टाक्या आदळल्याने ते जखमी झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरु आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here