शिवसेना उमेदवाराच्या गळ्यात चपला, बुटांचा हार सर्वत्र चर्चेचा विषय

0
32

द पॉईंट नाऊ ब्युरो : केव्हा काय घडेल सांगता येत नाही, उत्तर प्रदेशात निवडणुकीत उभे राहिलेल्या एका उमेदवाराने चक्क स्वतःच्या गळ्यात बुटांचा हार घालून प्रचारास प्रारंभ केला. विशेष म्हणजे हा उमेदवार शिवसेना पुरस्कृत असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे.

उत्तर प्रदेशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. आणि इथल्याच अलिगढ विधानसभा मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार चपलांचा हार घालून आपला प्रचार करतो आहे. पंडित केशव देव असं या उमेदवाराचं नाव आहे. आणि तो शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहे. आणि त्यांचं बूट हे निवडणूक चिन्हं आहे.

निवडून आल्यानंतर जो कोणी भ्रष्टाचार करेल, त्याला आपण हा बुटांचा हार घालणार आहोत. असं पंडित केशव देव यांनी म्हटलं आहे. आता काय ते चित्र इथल्या निवडणुका संपून निकाल लागल्यावरच स्पष्ट होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here