द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : तालुक्यातील धोडप किल्ला तसेच विख्याऱ्या डोंगरावर पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. या डोंगर रांगेवर पाऊस झाल्यावर ‘वार्षी धरण’ भरून ‘धोडी धरण’ तसेच ‘रामेश्वर धरणाला’ पाणी येऊन मिळते यामुळे या परिसरात होणाऱ्या पाऊसावर तालुक्याचे लक्ष लागून असते.
परिसरात आज दुपार पासून मुसळधार पावसाळा सुरवात झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘कोलती नदी’ ला आज पूर आल्याने लवकर वार्षी धरण भरण्याची चिन्हे निर्माण झालीत.
वार्षी धरणावर खर्डे(वा)तसेच परिसरातील शेतकऱ्यांची मदार आहे. वार्षी धरण भरले तरच त्या खोऱ्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येत असतात. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडझाप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, मात्र आज काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
स्वर्गीय ‘हंसराज काका’ यांच्या शेतीलगत असलेले धरण आज रात्रीत भरण्याची चिन्हे आहेत,असाच पाऊस सुरू राहिल्यास वार्षीच्या मुख्य धरणात पुराचे पाणी पोहचेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.
देवळा तालुक्यातील हनुमंतपाडा, वार्षी, मुलूकवाडी , खर्डे, शेरी, कांचने, कणकापूर या गावांमध्ये पावसाचा जोर वाढता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Good news