देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुलभा जितेंद्र आहेर यांनी बुधवार (दि २) रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता . कार्यक्रमाला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिकुबाई आहेर उपस्थित होत्या .

प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना आहेर, उपप्राचार्य डॉ मालती आहेर आदींसह सर्व नवनिर्वाचित नगरसेविका उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुशीलाताई आहेर यांनी केले .कार्यक्रमास प्रभागातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . सुलभा ह्या नगरसेवक जितेंद्र आहेर यांच्या सुविद्य पत्नी असून, नुकत्याच झालेल्या देवळा नगरपंचायत निवडणुकीत त्या प्रभाग क्रमांक ४ मधून निवडून आल्या आहेत . त्यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात उपस्थित महिलांना वाण भेट देऊन महिलांच्या अडीअडचणी समजून घेत त्या मार्गी लावण्यासाठी आपण काम सुरू केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम