मंत्री डॉ. पवार यांचे देवळा शहरात स्वागत ; टपरीवर घेतला चहाचा आस्वाद

0
24

देवळा – ना .डॉ. भारती पवार देवळा येथे  चहाचा अस्वाद घेतांना समवेत आ.डॉ .राहुल आहेर व कार्यकर्ते (छाया – सोमनाथ जगताप)

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा येथे ना. डॉ भारती पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ .भारती पवार यांचे (दि २१) प्रथमच देवळा शहरात आगमन झाल्याने त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले . ना पवार यांनी देवळा येथील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. शहरात आगमन होताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत त्यांची सव्वाध्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी त्यांचे समवेत आ.डॉ .राहुल आहेर यांचे सह भाजपाचे भाऊसाहेब पगार, जिंतेद्र आहेर , प्राचार्य हितेंद्र आहेर, तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण, अतुल पवार, किशोर आहेर ,बापु देवरे, प्रवीण मेधने, प्रवीण सुराणा, पवन अहिरराव, विजय आहेर ,अशोक सुराणा, पप्पू हिरे, राहुल देवरे ,विजय आहेर,हर्षद मोरे,दीपक आहेर, विलास शिंदे, हर्षद भामरे ,सुनील भामरे ,प्रदीप आहेर, शांताराम पवार, निंबा निकम, सुनील देवरे, अनिल आहेर, रोशन अलिटकर, भाऊसाहेब आहेर, अतुल देवरे, अनिल पगार आदी उपस्थित होते .

ना. डॉ. भारती पवार यांनी देवळा पांचकंदिल चौकातील चहाच्या टपरीवर जावुन कार्यकर्त्यांसमवेत चहाचा अस्वाद घेतला त्यामुळे आपण आजही सर्वसामान्य असल्याचा संदेश त्यांनी दिला .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here