राणेंना कोर्टाची चपराक पोलीस कोठडीत रवानगी

0
40

कोकण प्रतिनिधी : सेना राणे संघर्षात भाजप आमदार नितेश राणे यांना कोर्टाची चपराक बसली असून. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबतची आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

दुपारी नितेश राणे यांनी शरणागती पत्करल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. याचवेळी पोलिसांकडून राणेंना दहा दिवसांची पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी केली होती. व ही मागणी मान्य झाली असून राज्य सरकारची सुप्त इच्छा पूर्ण झाली आहे.

राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयात दाखल झाल्यानंतर चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले होते.

आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यामुळे राणेंना मोठा धक्का मानला जात आहे. भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून अद्याप कुठल्याही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here