द पॉईंट नाऊ ब्युरो : शिवसेना नेते संजय राऊत यांचा जवळचा व्यक्ती देखील आता ईडीच्या रडारवर आला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या या निकटवर्तीयास अटक करण्यात आली आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळ्यात 1000 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याप्रकरणीच संजय राऊत यांचे जवळचे संबंध असलेले प्रवीण राऊत यांना अटक केली गेली आहे. ईडीने केलेल्या चौकशीनंतर HDIL कंपनीने केलेला हा घोटाळा समोर आला होता.
दरम्यान संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर, प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून 50 लाख रुपये टाकले गेले असल्याचं बोललं जात आहे.
आता या सगळ्या प्रकरणामुळे संजय राऊत यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता संजय राऊत या प्रकरणी काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम