स्वप्निल अहिरे,
आराई प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे संत शिरोमणी सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भव्य आणि दिव्य काम अंतिम टप्प्यात आले असून, मंदिरासाठी कलश दानसाठी भीक्षा फोरीला, टाळ, मृदुंग व भजनाच्या मधुर वाणीने बसस्थानकापासून सकाळी नऊ वाजता सुरुवात करण्यात आली.
बस स्थानक ते नवनाथ मंदिर, दादा पीर महाराज मंदिर श्रीराम चौक हनुमान चौक मार्गे संपूर्ण गावात भिक्षा फेरी काढण्यात आली होती गावातील प्रत्येकाने कलस दानासाठी प्रत्येकाच्या परीने दान देऊन सहभाग घेतला.
संत शिरोमणी सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ भिक्षा फेरीची सांगता झाली. यावेळी जुनी शेमळी येथील श्रीराम भजनी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले, दिलीप अहिरे, कैलास बच्छाव,वसंत खैरनार, देविदास खैरनार, ज्ञानेश्वर शेलार, दिलीप वाघ, मच्छिंद्र अहिरे, विजय बच्छाव, रमेश अल्हाट, मनोहर बागुल, निंबा गांगुर्डे, वसंत बच्छाव, साहेबराव गांगुर्डे, कैलास खैरनार,सोमनाथ शेलार, जनार्दन शेलार, सागर शेलार, भास्कर बच्छाव,दादा बागुल, संजय गांगुर्डे ,राहूल शेलार, प्रशांत शेलार, देवेंद्र खैरनार ,सागर बच्छाव, भाऊसाहेब बच्छाव, दादा सोनवणे, गोविंदा सोनवणे, भाऊसाहेब शेलार, शिवाजी शेलार, संदीप वाघ,बबलू बागुल आदीसह श्री संत शिरोमणी सावता महाराज समिती व गावातील समस्त ग्रामस्थांचे भिक्षा फेरीला सहकार्य लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम