द पॉईंट नाऊ : भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पोलिसांकडून नितेश राणेंना दहा दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली अशी मागणी केली जात आहे. यामुळे राणेंना पोलीस कोठडी मिळणार का याकडे लक्ष लागून आहे.
काल सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा अर्ज मागे घेत ते पोलिसांपुढे शरणागती पत्करतील अशी माहिती अॅड. सतिश मानेशिंदे यांनी दिली होती. यानंतर नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग तपास अधिकाऱ्यांकडे शरणागती पत्करली. ते कणकवली दिवाणी न्यायालयात दाखल झाले. चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याची माहिती त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिल्याचे बोलले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने राज्य सरकारने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण मी आज स्वत:हून न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याचे राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या (SDCC Bank election) निवडणूकीच्या वेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता. इनोव्हामधून आलेल्या दोघांनी आपल्यावर शस्त्राने हल्ला केल्याचा दावा संतोष परब यांनी केला होता. या हल्लामागे भाजप आमदार नितेश राणे असल्याचा आरोप संतोष परब यांनी केला त्यानंतर कोकणातील सेना भाजपा संघर्ष चिघळला.
संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत. यानंतर नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून नितेश राणे अज्ञातवासात होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम