आराई ग्रामस्थांचे कार्यकारी अभियंता बोंडे यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन

0
64

स्वप्निल अहिरे,
आराई प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील आराईसह, नवी शेमळी, जुनी शेमळी हया गावांचा वेळोवेळी विजेत बिघाड होत असल्याने व वीज वितरण कंपनीच्या लपंडावाच्या खेळामुळे त्रस्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले.

वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने गावात तसेच शिवारात रोज लाईट ये जा करत असते. याचे कारण म्हणजे आराई फीडरला सात ते आठ गावे जोडली आहेत त्यामुळे कोणत्याही गावात बिघाड झाल्याने सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.

सद्यस्थितीत सटाणा, सौंदाने व ब्राम्हणगाव अशी फिडर असून त्यांच्यावरून गावाला व शिवाराला वीज पुरवठा केला जात आहे. पैकी सौंदाणे फिडरवरील वीज पूरवठा विस्कळित झाला असून वीज पुरवठा एवढा कमी असतो की सिंगल फेज वरील उपकरणे देखील चालत नाहीत. शेती पिके अगदी करपून चालली आहेत. वीज वितरण कंपनीच्या सुरू असलेल्या वीज पुरवठ्याच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून पर्यायाने पिकांचेही नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मुश्किलीेत मजूर मिळत नसताना देखील कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. त्यात पाणी भरणे कामी जाताना विजेचा लपंडाव एवढा असतो की शेतकरी त्रस्त होऊन जातो.

वीज पुरवठा तर वेळेवर नाही मात्र वीजबिले अगदी वेळेत मिळतात तसेच त्यांची वसुली एवढी कडक असते की ती भरण्याखेरिज पर्याय नसतो. शेतकऱ्यांचे कांदालागवडीसाठी एवढे हाल झाले आहेत की त्यात वीजवितरण कंपनीचा कर्मचारी गेला आणि वसुली सांगितली तर त्याचा राग येऊन काही वावगे घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

महावितरण कंपनीवर रोष असल्याने आराई ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने वीज सुरळीत राहील यासाठी कार्यकारी अभियंता बोंडे साहेब यांना सर्व परिस्थिती लक्षात आणून दिली. यावर सकारात्मक चर्चा होऊन येत्या चार पाच दिवसात वीजपुरवठा पूर्ववत करून देऊ असे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी लोकनियुक्त सरपंच मनिषा अहिरे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य माधवराव अहिरे, डॉ. गोकुळ अहिरे, खंडेराव सोनवणे, सुरेश नथु अहिरे, गोकुळ बारकू अहिरे, साहेबराव अहिरे, गोकुळ बाळासाहेब आहिरे, भूषण पवार, रिंकू सोनवणे, हर्षल सोनवणे, योगेश येवला, बंडू माणिक आहिरे आदींसह शेतकरी उपस्थित होते


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here