द पॉईंट नाऊ विशेष : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेणे अशक्य आहे. असे स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
सोमवारी 10 वी आणि 12 वी चे विद्यार्थी परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. या मुलांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
आता वर्षा गायकवाड यांनी मात्र स्पष्टपणे 30 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन होऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आणि यास बोर्डाचा देखील विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र यामुळे आता एक प्रश्न निर्माण होऊ लागला आहे तो हा की, बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत अट्टहास का केला जात आहे? विद्यार्थ्यांना परिक्षांबाबत गांभीर्य राहिलेले नाही की ऑनलाइन पर्याय सोपा वाटत असल्याने ऑफलाईन परीक्षाच देण्याचा विद्यार्थ्यांनी मानस सोडला आहे? असे देखील प्रश्न निर्माण होत आहेत.
कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर सर्वच स्तरातील परीक्षा ऑनलाइन झाल्या आणि परीक्षा उत्तीर्ण होण्यास सोयीस्कर मार्गच एक प्रकारे मिळाला. त्याच कारणाने तर आता ऑनलाइन परीक्षांची मागणी तर होत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मात्र विद्यार्थ्यांनी भविष्याचा विचार करून आता गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. मागे तज्ज्ञ लोकांनी मांडलेल्या मतानुसार, भविष्यात नोकरी मिळताना देखील नोकरी देणारे समोरील उमेदवार कोणत्या कालावधीत डिग्री उत्तीर्ण झाला आहे, याचा विचार करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजचा नव्हे तर भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे.
राज्य सरकार 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा ऑफलाईन घेणार आहे. तर त्यात निश्चितच सर्व ती काळजी घेतली जाईल. म्हणून विद्यार्थ्यांनी देखील आपल्या भविष्याचा विचार करूनच पाऊले उचलणे गरजेचे आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
कोरोनापेक्षा अभ्यासाची धास्ती जास्त आहे