यंदाच्या कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेत आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी बंगळुरुमध्ये 12 आणि 13 फेब्रुवारीला ही लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. आयपील मधील 10 संघ या लिलावात खेळाडूंची खरेदी करून त्यांवर बोली लावतील. या मेगा लिलावात एकूण 590 खेळाडू सहभागी होणार असून यात 228 कॅप्ड प्लेयर्स, 355 अनकॅप्ड प्लेयर्स आणि 7 असोसिएट नेशनच्या प्लेयर्सचा समावेश असेल.
भारतीय क्रिकेट संघातील श्रेयस अय्यर, शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, ईशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर , दीपक चाहर ,ईशांत शर्मा, उमेश यादव या खेळाडूंचा समावेश आहे.
परदेशी खेळाडूंमध्ये फाफ ड्युप्लेसीस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डिकॉक, जॉनी बेयरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्रावो, शाकिब अल हसन आणि वानिडू हसरंगा या क्रिकेटर्सचा यांत समावेश आहे. 2 कोटींच्या रेंजमध्ये यांत 48 खेळाडूंचा समावेश आहे. 20 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी इतकी असून 34 खेळाडू 1 कोटीच्या मूळ किंमतीसह लिलावात उपलब्ध असतील.
परदेशातसह इतर खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा बोलबाला दिसून आला. त्यांचे एकूण 47 खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत. पाठोपाठ वेस्ट इंडीज 34 आणि दक्षिण आफ्रिका 33, न्यूझीलंड आणि इंग्लंड 24, श्रीलंका 23 आणि अफगाणिस्तानच्या 17 खेळाडूंचा समावेश आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम