मुंबई : काही दिवसांपूर्वी युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊने सोशल मिडीयावर दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अफवा पसरवली होती. त्याच्या त्या व्हिडीओ द्वारे काल (३१ जानेवारी)हजारो विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे बरीच जिल्हयात आक्रमक वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच आज त्याला बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.
बऱ्याच राजकीय नेत्यांनी यावर आपल्या आक्रमक प्रतिक्रिया दर्शवल्या आहेत. नुकतेच यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील देखीलआक्रमक झाल्या असून ट्विटर वरील अधिकृत माध्यमातून आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
“प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या जीवाशी खेळणारा “भडखाऊ भाईजान” ला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे, त्याच्यावर तात्काळ कारवाई करून त्याची मस्ती जिरवावी”, अशी तरतूद गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत असे म्हटले गेले आहे , मात्र सोशल मीडियावर दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार आहे अशी अफवा ‘हिंदुस्थानी भाऊ’ ऊर्फ विकास पाठक तरुणाने पसरली होती. हिंदुस्थानी भाऊने आम्हाला बोलावले असून त्यांनीच आंदोलनासाठी निर्धार केल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले. त्यामुळे या गोंधळाचा मुख्य सूत्रधार हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम