मंत्री अनिल परबांना रिसॉर्ट भोवणार; परबांवर होणार गुन्हा दाखल

0
43

द पॉईंट नाऊ ब्युरो : महाविकास आघाडी सरकारचे मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे.याबाबत केंद्र सरकारने आदेश दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार मधील प्रमुख मंत्री, नेत्यांच्या पाठीशी हात धुवून लागलेले आहेत. सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली मुरुड येथील रिसॉर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, परबांनी बेकायदेशीररित्या हे रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात सोमय्या यांनी तक्रार केली होती.

आता अनिल परब यांचे हे रिसॉर्ट पाडण्याचे आणि परबांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत किरीट सोमय्या यांनी माहिती दिली आहे. आता या प्रकरणी पुढे काय पाऊले उचलली जातात. हे लवकरच स्पष्ट होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here