अर्थसंकल्पात ड्रोन संदर्भात केली ही महत्त्वाची घोषणा ; वाचा सविस्तर

0
36

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2022-2023 सादर केले आहे. या बजेटमध्ये ड्रोन्सच्या वापराबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत असेही सांगितले की, विविध अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून ड्रोन शक्तीसाठी स्टार्टअपला प्रमोट करेल. याद्वारे ड्रोनला व्यव्यव सायातून एक सर्व्हिस म्हणून वापरण्यासाठी काम केले जाईल.

आता शेतीसाठी होणार ड्रोनचा वापर करू शकतो, अशी अर्थमंत्र्यांनी माहिती दिली आहे. सर्व राज्यांकडून निश्चित करण्यात आलेल्या ITIs मध्ये आवश्यक स्किल कोर्स सुरू केले जातील. या बजेटमध्ये ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन देण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मुख्यतः शेतकऱ्यांना त्याचा अधिक प्रमाणत फायदा होईल.

आजच्या संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पीकांचे मुल्यांकन, भूमी अभिलेखचे डिजिटायझेशन, किटकनाशके पोषक तत्वांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोनचा वापर करण्यात प्रोत्साहन मिळेल. ज्याचा वापर कृषी आणि ग्रामीण कंपन्यांमध्ये केला जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. सर्वात जास्त याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here