केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. बऱ्याच विरोधकांनी यावर नाराजी नोंदवली आहे. मोदी सरकारचा यंदाचा अर्थ संकल्प म्हणजे शून्य बजेट (Zero Sum Budget)असून त्यामधून राज्यातील कोणत्या कोणत्या भागातील क्षेत्राला काहीही मिळालं नाही असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय. निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी हि प्रतिक्रिया दर्शवली.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, “मोदी सरकारचे हे बजेट म्हणजे शून्य बजेट आहे. त्यामध्ये वेतनदार वर्ग, मध्यम वर्ग, गरीब आणि दुर्बल, युवक, शेतकरी आणि लघु, मध्यम उद्योगांना तितकासा फायदा होणार नसल्याचे म्हंटले आहे.
परदेशातून येणाऱ्या मशिन्स होणार स्वस्त, कापड आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त, शेतीची अवजारं स्वस्त होतील, मोबाईल – चार्जर, शूज – चपला, हिऱ्याचे दागिने इत्यादी महागड्या वस्तू स्वस्त होणार असल्याचं म्हंटल गेल आहे. नागरिकांच्या अधिक दैनंदिनी वस्तूंवर अधिक भर पडली पाहिजे होती अशी एकंदरीत प्रतिक्रिया राहुल गांधींनी हि प्रतिक्रिया दर्शवली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम