देशात येत्या वर्षभरात ऑनलाईन सेवा अधिक वेगाने आणि सुरळीत व्हावी यासाठी 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय २०२२-२३ आर्थिक असा वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. या निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात त्यांनी पंतप्रधान गती शक्ती उपक्रमाच्या मार्फत देशाची आर्थिक स्थिती जागतिक स्थरावर विकसित व्हावी या उद्देशाने अर्थसंकल्प मांडला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पीय २०२२-२३ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या 5G इंटरनेट सेवेची घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात देशात 5G इंटरनेट सेवा सुरू करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं आहे.
देशातील ऑनलाईन व्यवहार अधिक वेगाने व अतिक्रमकशील व्हावा यासाठी देशात येत्या काही वर्षात खासगी कंपन्यांच्या माध्यमातून 5G सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी म्हंटलं आहे. हि 5G सेवा स्पेक्ट्रमचा माध्यमातून पुरवली जाणार आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.
सोबतच नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम लवकरच उभारण्यात येणार आहे अशी घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी केली आहे. यामध्ये आरोग्यविषयक सेवा पुरवणाऱ्यांची डिजिटल नोंदणी करण्यात येईल. नोंदणी केल्यांनतर त्या आरोग्य सेवकाची आयडेंटिटी तयार होईल. सोबत इतर आरोग्य सुविधांचा युनिव्हर्सल लाभ मिळवता येईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम