नाशिक, मुंबई महापालिकेची प्रभाग रचना अंतिम टप्प्यात

0
16

मुंबई प्रतिनिधी : मुंबई सह नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका २०२२ चा कार्यक्रम अखेर जाहीर झालेला आहे . यादरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यातील महापालिका कार्यक्रमही जाहीर झाला. या प्रभाग रचनांची भौगोलिक मांडणी प्रसिध्द करण्यासाठी आणि त्‍यावर हरकती व सूचना मागवण्‍यासाठी कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे.

नाशिक (Nashik) महापालिका (Municipal Corporation) आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकी संदर्भातल्या प्रभाग रचनांची मांडणी आज मंगळवार, 1 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरापर्यंत जाहीर होणार आहे. अखेर निवडणूक आयोगाने राज्यातील 18 विविध महापालिकांच्या निवडणुकीसाठी टप्प्या-टप्प्याने प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमास मंजुरी दिली आहे.

महापालिकेच्या वतीने महापालिका संदर्भातल्या सूचना 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोग सादर केलेल्या सूचनावावर सुनावणी करेल. त्यानंतर 2 मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी या विवरण पत्राद्वारे सादर राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जातील. या संदर्भातील अखेरची सुनावणी नाशिक महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन आणि शहरातील 6 विभागात ही प्रभाग रचना एकाच वेळेस प्रसिद्ध केली जाणार आहे.

मात्र नाशिक महापालिकेची प्रभाग रचना फुलत्याची चर्चा सध्या होत आहे. नाशिक मधील काही नगरसेविकांनी आपल्या सोयीनुसार जिल्यातील वार्डांची रचना केली आहे. सिडकोतील एका नगरसेवकाच्याच घरात बसून ही प्रभाग रचना गुप्तपणे तयार केली जात होती, असा आरोप काही दिवसांपूर्वी एका नगरसेवकानेच केला होता, त्यामुळे आजच्या प्रभाग रचनेकडे लक्ष लागले आहे. सध्या नाशिक मधील नगरेसवकांची संख्या 122 वरून 133 वर करण्यात आली आहे. यादरम्यान, आजच्या प्रभाग रचनेत कोणाचा वॉर्ड बदलणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची उत्सुकता सध्या लागली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here